दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं ।

वारीं वारीं जन्ममरणातें वारीं ।

हारीं पडलों आतां संकट निवारी ।। १ ।।


जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।। धृ ।।


त्रिभुवन भुवनीं पहातां तुजऐसी नाहीं ।

चारीही श्रमले परंतु न बोलवे कांहीं ।

साही विवाद करितां पडिलें प्रवाही ।

ते तूं भक्तांलागी पावसि लवलाहीं ।। २ ।।


जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।।


प्रसन्न वदनें प्रसन्न होसी निजदासां ।

क्लेशांपासुनि सोडविं तोडी भवपाशा ।

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।

नरहरि तल्लीन झाला पदपंकज लेशा ।। ३ ।।


जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।।

ही आरती तुमच्या पूजा पोथीत जोडा आणि सलग वाचायह आरती अपनी पूजा पोथी में जोड़ें और क्रमबद्ध पढ़ेंAdd this Aarti to your custom Pooja Pothi to recite sequentially

माझी पोथी बनवा →मेरी पोथी बनाएं →Make Pooja Pothi →