लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।।

लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ।।


कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।।

विभूतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ।।


देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें ।

त्यामाजीं अवचित हळाहळ जें उठिलें ।।

तें त्वां असुरपणे प्राशन केलें ।

नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ।।


व्याघ्रांबर फणिधरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।।

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ।।

ही आरती तुमच्या पूजा पोथीत जोडा आणि सलग वाचायह आरती अपनी पूजा पोथी में जोड़ें और क्रमबद्ध पढ़ेंAdd this Aarti to your custom Pooja Pothi to recite sequentially

माझी पोथी बनवा →मेरी पोथी बनाएं →Make Pooja Pothi →