नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमीपत्रें ।

लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।

ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।

अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।


जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। धृ ।।


तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।

त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।

वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।

सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।


जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।।


शरणागत सर्वस्वें भजती तव चरणी ।

कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणी ।

त्रैलोक्यी ते विजयी अद्भुत हे करणी ।

गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।


जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।।

ही आरती तुमच्या पूजा पोथीत जोडा आणि सलग वाचायह आरती अपनी पूजा पोथी में जोड़ें और क्रमबद्ध पढ़ेंAdd this Aarti to your custom Pooja Pothi to recite sequentially

माझी पोथी बनवा →मेरी पोथी बनाएं →Make Pooja Pothi →