आता विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।


जें खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।

भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।।


दुरितांचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्य पाहो ।

जो जे वांछील तो तें लाहो । प्राणिजात ।।


वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ।।


चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गांव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।


चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।


किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकीं ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ।।


आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्टविजयें । होआवे जी ।।


येथ म्हणे श्रीविश्वेशराओ । हा होईल दानपसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाहला ।।

ही आरती तुमच्या पूजा पोथीत जोडा आणि सलग वाचायह आरती अपनी पूजा पोथी में जोड़ें और क्रमबद्ध पढ़ेंAdd this Aarti to your custom Pooja Pothi to recite sequentially

माझी पोथी बनवा →मेरी पोथी बनाएं →Make Pooja Pothi →