सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।


जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।


रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुमकुम केशरा ।

हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।


जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।


लंबोदर पीतांबर फणीवरबंधना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।


जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।

ही आरती तुमच्या पूजा पोथीत जोडा आणि सलग वाचायह आरती अपनी पूजा पोथी में जोड़ें और क्रमबद्ध पढ़ेंAdd this Aarti to your custom Pooja Pothi to recite sequentially

माझी पोथी बनवा →मेरी पोथी बनाएं →Make Pooja Pothi →