येई ओ विठ्ठले माझे माउली ये ।

निढळावरी कर ठेवूनि वाट मी पाहें ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा ।।

जय देव जय देव ।।

आलिया बाळका लागलीसी भूक ।

विस्तारुनी स्तनपान पाजी प्रेमामृत ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा ।।

जय देव जय देव ।।

पक्षीणी प्रभाते चारा चरणी गेली ।

पिल्लांसी आठवूनी वेगे परतली ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा ।।

जय देव जय देव ।।

नामा म्हणे विठोबा तूंचि माझी आई ।

न विसंबे क्षणाभरी मज ठाव देईं ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा ।।

जय देव जय देव ।।

ही आरती तुमच्या पूजा पोथीत जोडा आणि सलग वाचायह आरती अपनी पूजा पोथी में जोड़ें और क्रमबद्ध पढ़ेंAdd this Aarti to your custom Pooja Pothi to recite sequentially

माझी पोथी बनवा →मेरी पोथी बनाएं →Make Pooja Pothi →