अवतार गोकुळीं हो, जन तारावयासी ।

लावण्यरूपडें हो, तेज:पुंजाळ राशी ।

उगवलें कोटिबिंब, रवि लोपला शशी ।

उत्साह सुरवरां, महाथोर मानसीं ।। १ ।।


जय देवा कृष्णनाथा, जय रखुमाई कांता ।

आरती ओवाळीन, तुम्हां देवकीसुता ।। धृ ।।


कौतुक पहावया, माव ब्रह्मयानें केली ।

वत्सेंही चोरूनियां, सत्यलोकासी नेलीं ।

गोपाळ गाईवत्सें, दोन्ही ठाईं रक्षिलीं ।

सुखाचा प्रेमसिंधु, अनाथांची माउली ।। २ ।।


जय देवा कृष्णनाथा, जय रखुमाई कांता ।

आरती ओवाळीन, तुम्हां देवकीसुता ।।


चोरितां गोधनें हो, इंद्र कोपला भारी ।

मेघ कडाडिला, शिळा वर्षल्या धारीं ।

रक्षिलें गोकुळ हो, नखीं धरिला गिरी ।

निर्भय लोकपाळ, अवतरले हरी ।। ३ ।।


जय देवा कृष्णनाथा, जय रखुमाई कांता ।

आरती ओवाळीन, तुम्हां देवकीसुता ।।


वसुदेव देवकीचे, बंद फोडिली शाळ ।

होऊनिया विश्वजनिता, तया पोटींचा बाळ ।

दैत्य हे त्रासियेले, समूळ कंसासी काळ ।

राज्य हें उग्रसेना, केला मथुरापाळ ।। ४ ।।


जय देवा कृष्णनाथा, जय रखुमाई कांता ।

आरती ओवाळीन, तुम्हां देवकीसुता ।।


तारिले भक्तजन, दैत्य सर्व निर्दाळूनी ।

पांडवां साह्यकारी, अडलिया निर्वाणीं ।

गुण मी काय वर्णूं, मती केवढी वाणी ।

विनवितो दास तुका, ठाव मागे चरणीं ।। ५ ।।


जय देवा कृष्णनाथा, जय रखुमाई कांता ।

आरती ओवाळीन, तुम्हां देवकीसुता ।।

ही आरती तुमच्या पूजा पोथीत जोडा आणि सलग वाचायह आरती अपनी पूजा पोथी में जोड़ें और क्रमबद्ध पढ़ेंAdd this Aarti to your custom Pooja Pothi to recite sequentially

माझी पोथी बनवा →मेरी पोथी बनाएं →Make Pooja Pothi →