आता विश्वात्मके देवे,

येणे वाग्यज्ञे तोषावे ।

तोषोनि मज द्यावे,

पसायदान हे ।। १ ।।


जे खळांची व्यंकटी सांडो,

तया सत्कर्मी रती वाढो ।

भूतां परस्परे जडो,

मैत्र जीवांचे ।। २ ।।


दुरितांचे तिमिर जावो,

विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।

जो जे वांछील तो ते लाहो,

प्राणिजात ।। ३ ।।


वर्षत सकळमंगळी,

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी,

भेटतु भूतां ।। ४ ।।


चलां कल्पतरूंचे आरव,

चेतना चिंतामणींचे गाव ।

बोलते जे अर्णव,

पीयूषांचे ।। ५ ।।


चंद्रमे जे अलांछन,

मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन,

सोयरे होतु ।। ६ ।।


किंबहुना सर्वसुखी,

पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुषी,

अखंडित ।। ७ ।।


आणि ग्रंथोपजीविये,

विशेषी लोकी इये ।

दृष्टादृष्टविजयें,

होआवे जी ।। ८ ।।


येथ म्हणे श्रीविश्वेशराओ,

हा होईल दानपसावो ।

येणे वरे ज्ञानदेवो,

सुखिया झाला,

सुखिया झाला,

सुखिया झाला ।। ९ ।।

ही आरती तुमच्या पूजा पोथीत जोडा आणि सलग वाचायह आरती अपनी पूजा पोथी में जोड़ें और क्रमबद्ध पढ़ेंAdd this Aarti to your custom Pooja Pothi to recite sequentially

माझी पोथी बनवा →मेरी पोथी बनाएं →Make Pooja Pothi →