लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ।

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।

तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।। १ ।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ।। धृ ।।


कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।

विभूतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। २ ।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ।।


देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें ।

त्यामाजीं अवचित हळहळ जें उठलें ।

तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।

नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ।। ३ ।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ।।


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।

शतकोटींचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासाअंतरीं ।। ४ ।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ।।

ही आरती तुमच्या पूजा पोथीत जोडा आणि सलग वाचायह आरती अपनी पूजा पोथी में जोड़ें और क्रमबद्ध पढ़ेंAdd this Aarti to your custom Pooja Pothi to recite sequentially

माझी पोथी बनवा →मेरी पोथी बनाएं →Make Pooja Pothi →